तुम्हाला माहीत आहे का गुळवेल खाण्याचे फायदे Benifits of giloy juice in marathi
संस्कृत भाषे मध्ये गुळवेल ला अमृता असं म्हटलं जातं आणि खरोखरच ती अमृता सारखी गुणकारी आहे. ती ज्वरनाशक वनस्पती म्हणून ओळख ली जाते.
गुळवेलीच्या नियमित सेवनामुळे पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या, जुलाब, अतिसार यांसारख्या समस्या दूर होतात.
आजच्या धावपळी जीवनशैली मुळे अनेकांना लहान वयात मधुमेहाचा त्रास संभवतो. अशा व्यक्तीने गुळवेल पावडरीचे उपाशी पोटी सेवन केल्यास मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते.
वाढत्या वयात ही आपल्याला त्वचा चमकदार राहण्यासाठी आणि त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत म्हणून गुळवेल उपयोगी ठरते.
जर डेंग्यू झाला असेल तर गुळवेल तुळस काळी मिरी आणि आलं हे समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवा आणि हा काढा ( giloy juice in marathi) दिवसातून तीन वेळा घ्यावा.